नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 03:59 PM2018-03-18T15:59:51+5:302018-03-18T16:00:22+5:30

एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान आहे

I am a big fan of Narendra Modi - Kangana Ranaut | नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत  

नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत  

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय करियरची स्तुती केली आहे. ती त्यांच्या यशाने प्रभावित झाली आहे.  मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्‍ट असू शकत नाही. पण आपण त्यांना बॅलेन्स करू शकतो, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणौतने केलं आहे. काल एका कार्यक्रमामध्ये ती बोलत होती. त्यावेली ती म्हणाली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळं कंगनाच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ती अजूनही याबाबत स्पष्ट बोलली नाही.  

कंगना मोदींचे कौतुक करुनच थांबली नाही तर तिने राजकारणात येण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र यावेळी तिने एक अट बोलून दाखवली. मला राजकारणात येण्यास काहीही अडचण नाही. पण मला नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. मला माझ्या ग्लॅमरसह राजकारणात लोक स्वीकारण्यास तयार असतील तर मी राजकारणात येऊ शकते, असेही ती म्हणाली. 

दरम्यान, सद्या कंगना राणौत तिच्या आगामी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या चित्रकरणामध्ये व्यस्त आहे.  

 

Web Title: I am a big fan of Narendra Modi - Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.