'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:25 PM2024-04-22T12:25:37+5:302024-04-22T12:29:22+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

Lok Sabha Election 2024 shiv sena leader Aditya Thackeray criticized on Ajit Pawar | 'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

"देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. आमची ही शक्ती चार जूनला दिसेल. शिंदेंची शिवसेना नाही, त्यांचा गद्दार गट आहे.त्यांच्या अर्ध्या जागा बदलाव्या लागत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,  त्यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी अजूनही पाहिला नाही. ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठित खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करुन सगळे उद्योग गुजरातला पळवले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं. ज्यांनी तुम्हाला मंत्रिपद दिली, त्यांच्या कठीण काळात खंजीर खूपसन आणि अशी वक्तव्य करणे यांच्यासारखी मी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर साधला.

"आम्ही शिवसेनेच्या गाण्यातून तो शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने आधी भाजपावर कारवाई केली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले. 

भाजपा नेत्यांना महाविकास आघाडी सरकार काळात तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, जे तुरुंगाला घाबरून गुजरातला गेले त्यांचं महाराष्ट्र अजिबात ऐकणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

Web Title: Lok Sabha Election 2024 shiv sena leader Aditya Thackeray criticized on Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.