'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:46 AM2024-04-22T10:46:23+5:302024-04-22T10:52:10+5:30

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

lok Sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray over the post of Chief Minister | 'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे, तसेच मोठा गौप्यस्फोटही केला. 

माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

'राज्यात शिवसेना १६ जागा लढवणार आहे. यामध्ये मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे. जागावाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसून विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करून ४२ जागा जिंकून २०१९ चा विक्रम मोडणार असल्याचेही  सीएम शिंदे म्हणाले.

"उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. महाविकास आघाडीची स्थापना ही पूर्वनियोजित खेळी होती. वडिलांप्रमाणे किंगमेकर बनण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना स्वतः किंग व्हायचे आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.

" महाविकास आघाडी सरकारने जून २०२२ मध्ये भाजपा नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला.

माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेणार होते

"महाविकास आघाडी सरकारमध्ये सतत माझा अपमान होत होता. यात ठाकरे कुटुंबाचा १०० टक्के हस्तक्षेप होत होता, माझ्याकडे नगरविकास खाते होते पण, मला स्वतंत्रपणे कधीही काम करू दिले नाही. आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप होता, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.  अनेक वेळा मला ते नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका बोलावताना आढळले. पक्ष फुटण्यापूर्वी  नगरविकास खाते माझ्याकडून काढून घेण्याचा ठाकरे विचार करत होते, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला. 

Web Title: lok Sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray over the post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.