गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या हातात हात घालून इव्हेंटमध्ये पोहोचला अरबाज खान! दिल्या बिनधास्त पोज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:06 PM2018-09-07T12:06:40+5:302018-09-07T12:07:44+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चर्चेमुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला.

arbaaz khan rumoured girlfriend giorgia andriani photos | गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या हातात हात घालून इव्हेंटमध्ये पोहोचला अरबाज खान! दिल्या बिनधास्त पोज!!

गर्लफ्रेन्ड जॉर्जियाच्या हातात हात घालून इव्हेंटमध्ये पोहोचला अरबाज खान! दिल्या बिनधास्त पोज!!

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चर्चेमुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला. प्रेमप्रकरण नवे-नवे असताना अरबाज उघडपणे ते मान्य करण्यास कचरला. पण अख्ख्या खान कुटुंबाने, मित्र मंडळींनी, एवढेच नव्हे तर एक्स-वाईफ मलायकाने त्याचे जॉर्जियासोबतचे नाते स्वीकारल्यानंतर अरबाज आता खुलेआम आपल्या गर्लफ्रेन्डसोबत फिरताना दिसतोय. आता तर अरबाज व जॉर्जिया लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत हे जोडपे खासगीत अनेकदा एकत्र दिसले. पण काल-परवा हे जोडपे प्रथमचं मीडियासमोर आले. तेही हातात हात घालून.

दोघांनीही  हातात हात घालून मीडियासमोर बिनधास्त पोझ दिल्यात. यावेळी जॉर्जिया कमालीची हॉट दिसत होती, हे सांगणे नकोच

.गत ४ आॅगस्टला अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जॉर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले, असे मानले जाते. या पार्टीत अरबाजची एक्स-वाईफ मलायकाही सामील झाली होती. त्यामुळे तिला अरबाजच्या या नव्या नात्याबद्दल काहीही आक्षेप नाही, हे उघडचं आहे.अरबाज खानसध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. भारतनंतर सलमान दबंगचे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले दबंगच्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. 

Web Title: arbaaz khan rumoured girlfriend giorgia andriani photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.