अरबाज खान विदेशी गर्लफ्रेन्डसोबत करणार लग्न??

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:05 PM2018-08-16T20:05:45+5:302018-08-16T20:06:55+5:30

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची कथित गर्लफ्रेन्ड जियोर्जिया एंड्रियानीसोबतच्या रिलेशनशिपमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अरबाज जिथे, जियोर्जिया तिथे, असे झालेय. 

Arbaaz Khan to marry girlfriend Giorgia Andriani | अरबाज खान विदेशी गर्लफ्रेन्डसोबत करणार लग्न??

अरबाज खान विदेशी गर्लफ्रेन्डसोबत करणार लग्न??

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची कथित गर्लफ्रेन्ड जियोर्जिया एंड्रियानीसोबतच्या रिलेशनशिपमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अरबाज जिथे, जियोर्जिया तिथे, असे झालेय. साहजिकचं दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा उघडउघड सुरू झालीय. आता यापुढची चर्चा रंगलीय. होय, अरबाज लवकरच जियोर्जियासोबत लग्न करणार, अशी खबर आहे.
मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज प्रचंड एकटा पडला होता. पण जियोर्जिया आयुष्यात येताच, त्याचे आयुष्य बदलले. हा बदल अरबाजला चांगलाच भावला आहे आणि आता त्याने दुस-यांना लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात अद्याप त्याने याबद्दलची घोषणा केलेली नाही. शिवाय कुटुंबाकडूनही परवानगी घेतलेली नाही.
गत ४ आॅगस्टला अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जियोर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले, असे मानले जाते. या पार्टीत अरबाजची एक्स-वाईफ मलायकाही सामील झाली होती. त्यामुळे तिला अरबाजच्या या नव्या नात्याबद्दल काहीही आक्षेप नाही, हे उघडचं आहे. त्यामुळे लवकरच भाईजानच्या घरी लगीनघाई सुरु झालेली दिसली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.

अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. भारतनंतर सलमान दबंगचे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले दबंगच्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. 

Web Title: Arbaaz Khan to marry girlfriend Giorgia Andriani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.