यवतमाळच्या कळंब चौकात तणाव, भाजप अन् वंचितचे उमेदवार आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 22:57 IST2019-10-18T22:56:51+5:302019-10-18T22:57:26+5:30
वाद वाढल्या ने अखेर येरावर येथून निघून गेले. या वेळी दोन्ही बाजूने घोषणा दिल्या गेल्या.

यवतमाळच्या कळंब चौकात तणाव, भाजप अन् वंचितचे उमेदवार आमने-सामने
यवतमाळ : भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार समोरासमोर आल्याने कळंब चौकात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री 9 ला ही घटना घडली, तणाव पाहून शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले, वंचितचे उमेदवार योगेश पारवेकर यांनी जाहीर सभा घेतली, त्याची रीतसर परवानगी होती. तर भाजपचे मदन येरावर यांच्या कडे परवानगी नव्हती.
वाद वाढल्या ने अखेर येरावर येथून निघून गेले. या वेळी दोन्ही बाजूने घोषणा दिल्या गेल्या. वंचितच्या सभेवर आक्षेप घेणे भाजपला चांगलेच महागात पडले. वृत्तलिहिस्तवर रीतसर तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला नव्हता.
कोट
भाजप कडे परवानगी नसताना सभा घेतली, पोलिसांना हाताशी धरून वंचित ची सभा उधळण्याचा प्रयत्न केला गेला, आपण ऑनलाइन तक्रार दाखल करणार आहोत.
- योगेश पारवेकर,
उमेदवार, वंचित आघाडी
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ