आदर्शनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, सहा जण अटकेत; साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त
By रवींद्र चांदेकर | Updated: August 29, 2022 18:32 IST2022-08-29T18:31:47+5:302022-08-29T18:32:23+5:30
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद

आदर्शनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, सहा जण अटकेत; साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ :पुसद तालुक्यातील वसंतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आदर्शनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना जेरबंद केले. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. या कारवाईत सहा जुगाऱ्यांकडून सहा हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विश्रामगृहालगतच्या आदर्शनगर येथील बंडू कांबळे याच्या घराच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत होते. माहिती मिळताच वसंतनगर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात आरोपी नंदू बंडू कांबळे (२६) रा. धनकेश्वरनगर, दत्तात्रय विश्वनाथ निकम (४६) रा. विठाबाईनगर, लक्ष्मण जयाजी जाधव (४५) रा. पारडी, अमोल विठ्ठल भोने (४०) रा. पारडी, गजानन तुळशीराम मोहिते (३०) रा. धनकेश्वरनगर, बंडू कांबळे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.