धाग्याच्या सहा हजार रिळ वापरून केली गणेशमूर्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:08 PM2019-09-07T18:08:39+5:302019-09-07T18:08:44+5:30

धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे

Ganesh idol made using six thousand reels of thread | धाग्याच्या सहा हजार रिळ वापरून केली गणेशमूर्ती 

धाग्याच्या सहा हजार रिळ वापरून केली गणेशमूर्ती 

Next

पर्यावरणपुरक उपक्रम: कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाची परंपरा 
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड:  गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाºया कारंजा शहरातील बाल हौशी गणेश मंडळाने यंदा या परंपरेत आणखी एक कडी जोडली आहे. त्यांनी यंदा शिवणकामासाठी वापरल्या जाणाºया धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती शहरातील गणेशभाविकांचे लक्ष वेधत आहे. 
े दिवंसेदिवस पर्यावरणाचा ºहास होऊन त्याचे भीषण वाईट परिणाम मानवी जिवनावर होत असतानाही बदल करण्याचे प्रयत्न अपेक्षीत प्रमाणात होत नाहीत. ही बाब विविध धार्मिक उत्सवातही दिसते. तथापि, अनेक गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळे पर्यावरणपुरक उत्सव साजरा करून समाजासमोर आदर्शही निर्माण करीत आहेत. त्यात कारंजा शहरातील भाजी बाजार परिसरातील बाल हौशी गणेश मंडळाचा समावेश आहे. हे गणेश मंडळ गेल्या २० वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करते. यासाठी ते निर्माल्याचे विसर्जन करताना पाणी प्रदुषित न होऊ देणे, गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण टाळत सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य करते. यंदाही त्यांनी ही परंपरा राखत. सहा हजार रिळ आणि लोकर वापरून आकर्षक गणेशमूर्ती तयार केली. ही मूर्ती मंडळातील मूर्तीकार अमित  कºहे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मिळून तयार केली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवा कºहे, उपाध्यक्ष रोहित परकोटे, सचिव मनोज देशमुख कोषाध्यक्ष सचिन विभुते, सदस्य आकाश कºहे, विजय शर्मा, चंद्रशेखर कडेल, गजानन वलीवकर, नवीन डांगुर निशांत गुलालकरी, संयम गुलालकरी, राज विभुते, शिवा ब्राह्मणे, शुभम राऊळ, स्वप्नील   बंड, प्रकल्प वैद्य, कौशल  बंड, रितेश  गुलालकरी, गुरु यवतेकर, मंगेश वैद्य, आशिष  वैद्य, सचिन  देशमुख , रितेश डांगुर, गौरव डांगुर, समीर बन्नौरे, सचिन बाखडे, गौरव सौरभ विभुते, आकाश व्यवहारे, स्वरूप कºहे तसेच सल्लागार अनंतराव कºहे, मंगेश कडेल, बाळूभाऊ यवतेकर आणि शरद कºहे आदिंनी सहकार्य केले. 
 
  एक हजार बटणचा वापर
कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धाग्याच्या सहा हजार रिळ वापरल्या, तसेच ही मूर्ती आकर्षक करण्यासाठी त्यांनी एक हजार बटणही वापरले आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनीही परिश्रम घेत आहेत. 
 
मूर्तीसाठी दरवर्षी नवे साहित्य 
गेल्या २० वर्षांपासून कारंजातील बाल हौशी गणेश मंडळ पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करीत असले तरी, एकदाही त्यांनी मूर्तीसाठी पूर्र्वीच्या साहित्याचा वापर केला नाही. कधी नारळापासून, कधी बांबूपासून, कधी पणत्यांपासून, कधी कवड्यांपासून, कधी गवतापासून, तर कधी शिंपल्यापासून त्यांनी आकर्षक अशा गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम इतर गणेश मंडळांसाठी आदर्श ठरणारा आहे.

Web Title: Ganesh idol made using six thousand reels of thread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.