"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 23:05 IST2026-01-08T23:02:14+5:302026-01-08T23:05:02+5:30
हिंदुत्ववादी विचारांचे शिलेदार निवडून देणे हे अत्यंत गरजेचे आहे. विकास तर होणारच, विकास कुठे पळून जाणार नाही असं नितेश राणेंनी सांगितले.

"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
नालासोपारा - आपल्याला हिंदू म्हणून आपापसात भांडण लावतात आणि हे लँड जिहाद, लव्ह जिहाद करतात. हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. यावर आपल्याला सतर्क राहिले पाहिजे असं सांगत लव्ह जिहादवरून मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा प्रहार केला. नालासोपारा येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, नालासोपारा,वसई-विरार असेल किती लव्ह जिहादचे प्रकार कानावर येतात. गेल्याच आठवड्यात एक प्रकार समोर आला. एका आमच्या हिंदू बहिणीला हिरव्या सापाने फसवले. अगोदर हिंदू नाव सांगितले त्यानंतर नाव बदलले, माझे खरे आशिष नव्हे अब्दुल आहे म्हटला. त्या मुलीला फक्त फसवले नाही तर तिच्या नावाचा रेटकार्ड सोशल मीडियावर टाकला. या लोकांची एवढी हिंमत होते असा घणाघात त्यांनी केला.
तसेच हिंदुत्ववादी विचारांचे शिलेदार निवडून देणे हे अत्यंत गरजेचे आहे. विकास तर होणारच, विकास कुठे पळून जाणार नाही. आज केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात भाजपा सत्तेत आहे. तुमचा आमदार भाजपाचा आहे. मंत्री म्हणून कोकणात काम करणारा नितेश राणे हादेखील भाजपाचा आहे. मग तुमचा विकास कोण थांबवणार आहे, मात्र तुम्ही नागरीक आणि हिंदू म्हणून या गोष्टींचा विचार करायला हवा. आपण कुठे राहतोय, कुठल्या परिसरात राहतोय. आपण फिरत असताना सुरक्षित आहोत की नाही ही भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे असं नितेश राणेंनी सभेत सांगितले.
दरम्यान, हे हिंदूराष्ट्र म्हणून आपल्याला वसई विरार, नालासोपारा येथे हिंदूंची ताकद जिथे आहे तिथे हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष भाजपालाच मतदान केले पाहिजे. चारही भक्कम उमेदवार तुम्हाला आम्ही दिलेत. १५ तारखेला बटण दाबण्याआधी जोरात जय श्रीराम, जय बजरंगबली बोला आणि कमळ बटण दाबा. जेणेकरून चारही उमेदवार महापालिकेत जातील. त्यानंतर कुणी हिरवा साप वळवळला तर आमचे चारही शिलेदार त्याला तिकडे त्याची जागा दाखवतील एवढी ताकद तुम्ही त्यांच्यामागे उभी करा. माझ्यासारखे आणखी नितेश राणे तयार करा. या लोकांना इतके हैराण करू की शुक्रवारी गॅस सिलेंडर वर येता कामा नये. हिंदुत्ववादी विचारांच्या मागे ताकदीने उभे राहा असं आवाहन त्यांनी जनतेला केले.