राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात? अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:09 IST2019-04-10T17:08:16+5:302019-04-10T17:09:12+5:30
पालघर लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात? अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी घेतला आक्षेप
पालघर - पालघर लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. राजेंद्र गावित ह्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस चे माजी खासदार दामू शिंगडा यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी आक्षेप घेतला असून, या आक्षेपानंतर छाननी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पालघर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत मागील काही शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्या बाबतचे प्रमाणपत्र आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडले नसल्याची हरकत सचिन शिंगडा अपक्ष उमेदवार यांनी घेतली आहे. या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच निर्णय देतील.
राजेंद्र गावित हे गतवर्षी झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान, बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कमळाऐवजी धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे.