तीन लाखांची स्टीलची भांडी वाटण्यासाठी आलेला टेंपो पोलिसांनी पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 17:53 IST2024-11-09T17:52:24+5:302024-11-09T17:53:51+5:30

वालीव पोलिसांनी शनिवारी सकाळी वालीव फाटा येथे ही कारवाई केली आहे.

Nalasopara Tempo who came to distribute steel pots worth three lakhs was caught by the police | तीन लाखांची स्टीलची भांडी वाटण्यासाठी आलेला टेंपो पोलिसांनी पकडला

तीन लाखांची स्टीलची भांडी वाटण्यासाठी आलेला टेंपो पोलिसांनी पकडला

नालासोपारा : वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांत सात कोटी रुपये रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर वालीव पोलिसांनी शनिवारी सकाळी वालीव फाटा येथून तीन लाख रुपयाची नवीन भांडी वाटपासाठी आलेला टेंपो पकडला आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने स्टीलची भांडी वाटप करण्यात येणार असून सदरची स्टीलची भांडी ही टेम्पो  क्रमांक एमएच ४८ डिसी २३९३ मधुन शिव भीम नगर, वलिव, वसई पूर्व येथून जाणार असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्यातील एटीसी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना मिळाली होती. नमूद ठिकाणी त्यांनी त्यांच्या पथकांसह नाकाबंदी करून टेंपो ताब्यात घेतला. त्यामध्ये स्टीलची नवीन भांडी आढळून आली आहेत. पोलीस याची पुढील चौकशी करत आहे.
 

Web Title: Nalasopara Tempo who came to distribute steel pots worth three lakhs was caught by the police