तब्येत बिघडल्याने आमदार हितेंद्र ठाकूर रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 19:30 IST2024-04-27T19:29:09+5:302024-04-27T19:30:16+5:30
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना विरारमधील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तब्येत बिघडल्याने आमदार हितेंद्र ठाकूर रुग्णालयात दाखल
मंगेश कराळे, नालासोपारा: वसईचे आमदारहितेंद्र ठाकूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना विरारमधील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भवर यांनी सांगितले. वसईचे आमदारहितेंद्र ठाकूर यांच्या घशाला झालेला संसर्ग आणि अतिश्रम यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे.
हितेंद्र ठाकूर हे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पालघर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी ही गेले नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु होत्या. त्याचे कारण समोर आले आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हितेंद्र ठाकूर यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रकृती रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.