ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:43 IST2021-06-09T20:43:22+5:302021-06-09T20:43:41+5:30

सावळी खुर्द घाटाजवळ घटना-वाहन सोडून चालक, वाहक पसार

Trailer overturns, killing 37 animals, seriously injuring 11 bulls | ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी

ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी

ठळक मुद्देअपघातातील जखमी झालेल्या जनावरांना व मृत पावलेला जनावरांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने काम केले.

कारंजा (घा.) (वर्धा) - नागपूरवरून अमरावतीकडे जातांना सावळी खुर्द घाटाजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास ट्रेलर (एचआर - ५५- एस ८७९५) उलटून ३७ जनावरांचा मृत्यू झाला तर ११ वळू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती कारंजा पोलीस स्टेशनला सकाळी आठ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दारासिंग राजपूत आपल्या चमूसह घटनास्थळावर दाखल झाले.

अपघातातील जखमी झालेल्या जनावरांना व मृत पावलेला जनावरांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने काम केले. अपघात होताच चालक, वाहक घटनास्थळावरून पसार झाले होते. सदर घटनेत मृत झालेल्या ३७ जनावरांवर वेगळ्या ठिकाणी रस्त्यालगतच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जखमी ११ वळूवर पशुसंवर्धन विभागाच्या चमूनी उपचार केले आहेत. जखमी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था पोलिस विभागाने केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहनडुळे, पोलिस उपनिरीक्षक मानकर यांच्यासह चमू उपस्थित होती. 

Web Title: Trailer overturns, killing 37 animals, seriously injuring 11 bulls