सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 17:21 IST2023-06-08T17:20:57+5:302023-06-08T17:21:54+5:30
Wardha News वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केली आहे.

सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड
वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केल्यानंतर सुमित वानखेडे यांचे आर्वी विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्या द्वारा अभिनंदन केले जात आहे.
सुमित वानखेडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभा सदस्य अनिल बोंडे, आमदार दादाराव केचे, पंकज भोयर, रामदास आंबटकर, प्रताप अडसङ भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील घपाट यांना दिले आहे.
सुमित वानखडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल भाजपा चे वरिष्ठ नेते सचिन होले, भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंबाळकर ,चर्मकार संघाचे राज्याचे माजी अध्यक्ष अशोक विजयकर, विधानसभा अध्यक्ष विजय बाजपेयी, माझी पंचायत समिती उपसभापती प्रा धर्मेंद्र राऊत, शहराध्यक्ष जगन गाठे ,तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे, जितेंद्र ठाकरे ,मयूर पोकळे, बाळा नांदुरकर, निखिल कडू, सागर ठाकरे ,निखिल कडू, कुणाल कोल्हे ,बाळाभाऊ सोनटक्के, रितेश लूनावत , योगेश ताजनेकर सह भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.