बळजबरी घरात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल

By चैतन्य जोशी | Updated: March 4, 2023 16:27 IST2023-03-04T16:25:02+5:302023-03-04T16:27:38+5:30

आरोपीच्या शोधार्थ पोलिस रवाना

Abuse of a minor girl by forcebly enterning into the house; case registered in Ashti police station | बळजबरी घरात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल

बळजबरी घरात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : माझ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे खोटे तुझ्या घरच्यांना सांगेल, असे म्हणत आरोपी नराधमाने पीडितेस बळजबरी स्वत:च्या घरात नेत बळजबरी अत्याचार केला. ही घटना आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी ४ रोजी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिस रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांनी दिली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडिता ही दररोज शाळेतून ये-जा करताना आरोपी महेश हा तिला तु माझ्या घरी ये, नाही तर तुझ्या आई वडिलांना माझ्यासोबत तुझे प्रेमसंबंध असल्याचे खोटे सांगेल, अशी धमकी दिली.

पीडितेने नकार दिला असता आरोपी महेशने तिचा जबरदस्तीने हात पकडून तिला स्वत:च्या घरात नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. पीडितेच्या बयाणावरुन आष्टी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांनी सांगितले.

Web Title: Abuse of a minor girl by forcebly enterning into the house; case registered in Ashti police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.