आता निवडणुकीला केवळ ९ दिवसाचा कालावधी शिल्लक असताना कॉँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांची प्रचार यंत्रणा तालुका पातळीवरील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली नसल्याने गजभिये खरच रामटेकच्या मैदानात आहेत का, असा सवाल सामान्य काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. ...
रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही. ...
रामटेकच्या गडावर सध्या भगवा असला तरी या मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसवर भरपूर प्रेम केले आहे. आजवर या मतदार संघात झालेल्या १७ निवडणुकीत १२ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. ...