Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
काल मुंबईत घडलेली घटना ही दुर्दैवी होती. एअर पोर्टकडे जाताना असे अनेक होर्डींग दिसतात, हे होर्डिंग समांतर हवे होते परंतु ते रस्त्यावर आहेत. - छगन भुजबळ ...
Loksabha Election - उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. ...
मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात, यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. ...