उल्हासनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची रॅली

By सदानंद नाईक | Published: May 10, 2024 10:25 PM2024-05-10T22:25:05+5:302024-05-10T22:26:12+5:30

रॅली, चौक सभा, बैठका व त्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार असल्याची माहिती

Uddhav Balasaheb Thackeray Party candidate Vaishali Darekar's rally in Ulhasnagar | उल्हासनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची रॅली

उल्हासनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची रॅली

सदानंद नाईक, उल्हासनगर : ठाकरेसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची गुरुवारी शहर पश्चिमेत तर शुक्रवारी शहर पूर्वेत प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत पक्षनेते वरून सरदेसाई, धनंजय बोडारे, शरद पवार गटाचे महेश तपासे यांच्यासह शेकडो जण सहभागी झाले होते. 

उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी काढलेल्या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांसह ठाकरेसेना, आप पक्ष, शरद पवार गट व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहर पश्चिमेतील बिर्ला गेट नीलकंठ मंदिर पासून सुरू झालेली रॅली पवई चौकात संपन्न झाली. तर पूर्वेत शुक्रवारी सायंकाळी रॅलीला सुरवात करून संपूर्ण पूर्वेत रॅली काढण्यात आली. रॅली, चौक सभा, बैठका व त्यानंतर महाआघाडी नेत्यांच्या सभा होणार असल्याची माहिती कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी दिली आहे.

Web Title: Uddhav Balasaheb Thackeray Party candidate Vaishali Darekar's rally in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.