भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी
By नितीन पंडित | Updated: April 8, 2024 13:40 IST2024-04-08T13:37:03+5:302024-04-08T13:40:07+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी
- नितीन पंडित
भिवंडी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या वतीने ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या वतीने कशेळी येथे शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे या उपस्थित होत्या. मात्र भिवंडीचे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी या मेळाव्याला दांडी मारली.
एकीकडे कल्याण लोकसभेतून भाजपकडून डॉ श्रीकांत शिंदे यांना विरोध होत असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शहापुर येथील कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांना जाहीर विरोध केला आहे.असे असतानाच आता उपनेते प्रकाश पाटील यांनी मेळाव्याला पाठ फिरवल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.तर भाजप कार्यकर्त्यांना समजाविण्यात देवेंद्र फडणवीस व भाजपचे पदाधिकारी योग्य ती भूमिका घेतील, त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजाविण्यात येईल व यातून मार्ग काढण्यात येईल व मतभेद संपविण्यात येतील अशी प्रतिक्रिया यावेळी नीलम ताई गोऱ्हे यांनी दिली आहे.