Thane: "शिंदेंचा उमेदवार गुजरातवरून ठरणार, "आदित्य ठाकरे यांचा टोला

By अजित मांडके | Published: April 29, 2024 01:57 PM2024-04-29T13:57:58+5:302024-04-29T13:58:57+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरात मधून ठरणार.असे वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केले. मिंधेना अजून गुजरातहून तिकीट कोणाला द्यायचे याची ऑर्डर आलेली नाही. यांना तिकीट मिळेल की नाही त्यातील शाश्वती नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

Thane: "Shinde's candidate will be from Gujarat," says Aditya Thackeray | Thane: "शिंदेंचा उमेदवार गुजरातवरून ठरणार, "आदित्य ठाकरे यांचा टोला

Thane: "शिंदेंचा उमेदवार गुजरातवरून ठरणार, "आदित्य ठाकरे यांचा टोला

- अजित मांडके   
ठाणेठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरात मधून ठरणार.असे वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केले. मिंधेना अजून गुजरातहून तिकीट कोणाला द्यायचे याची ऑर्डर आलेली नाही. यांना तिकीट मिळेल की नाही त्यातील शाश्वती नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

 ठाणे  लोकसभा  मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे  यांनी सोमवारीआपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील  समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर  त्यानंतर  तेथूनच  एक   रॅली काढण्यात आली.

या रॅलीत  जांभळी नाका परिसरात  शिवसेनानेने  युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते.या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.दुपारी साडे बारा च्या मुहुर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Web Title: Thane: "Shinde's candidate will be from Gujarat," says Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.