“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:04 IST2026-01-04T09:04:50+5:302026-01-04T09:04:50+5:30
सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे आव्हाड म्हणाले.

“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका
ठाणे : बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया ही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीच्या हत्येची ही नवी पद्धत असल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली.
ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. सत्ताधारी पक्षांनी सत्याचा नव्हे तर पोलिस यंत्रणेचा वापर करून विरोधकच संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मग लोकशाही कशाला आणि निवडणुका कशासाठी? याचे दुष्परिणाम भारताला भविष्यात भोगावे लागतील.