ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

By अजित मांडके | Updated: May 8, 2024 19:55 IST2024-05-08T19:54:27+5:302024-05-08T19:55:02+5:30

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे. 

Naresh Mhaske's show of strength in the Thackeray faction | ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

ठाणे : शिवसेनेत खूप पडल्यानंतर ठाण्यातील चंदनवाडी ही शाखा ठाकरे गटाकडे राहिली होती त्यानंतर बुधवारी याच शाखेत जाऊन शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचारादरम्यान ठाकरे गटातील शाखेत प्रवेश करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घातला आणि नतमस्तक होत शाखेत घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले. मात्र यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे. 

या शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे  श्रद्धास्थान मानले जाते. ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना शाखा कोणाची या मुद्द्यावरून भांडण रंगलेली पाहायला मिळाली होती. शिवसैनिक एकमेकांच्या पुढे उभे ठाकले होते, मात्र चदनवाडी शाखा त्याला अपवाद ठरली होती. याच शाखेवर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर काळे फासले होते. त्यामुळे आशा प्रकारे प्रचारात शाखेवर जाऊन डीवचण्याचा प्रयन्त पुन्हा एकदा शिंदे गटाकडून करण्यात आला.

Web Title: Naresh Mhaske's show of strength in the Thackeray faction