उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सरदाराविना काँगेस, उद्धवसेना, मनसे उमेदवार रिंगणात
By सदानंद नाईक | Updated: January 10, 2026 19:21 IST2026-01-10T19:19:49+5:302026-01-10T19:21:04+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणूकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सरदाराविना काँगेस, उद्धवसेना, मनसे उमेदवार रिंगणात
- सदानंद नाईक, उल्हासनगर
उल्हारनगर शहरात खरी लढत भाजप विरुद्ध शिंदेसेना, ओमी टीम व साई पक्षाच्या युती सोबत असलीतरी, अनेक ठिकाणी उद्धवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत त्यांच्यासमोर आवाहन निर्माण केले. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे.
इतर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?
स्थानिक साई पक्षाचे ११ ठिकाणी टीव्ही चिन्हावर तर प्रभाग क्रं-१८ मध्ये पीआरपी पक्षाचे ४, तर प्रभाग क्रं-१२ मध्ये ओमी टीम समर्थक ४ ठिकाणी विविध चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. विरोधी पक्षातील उद्धवसेना-४२, काँग्रेस-३२ व मनसे ७ ठिकाणी रिंगणात आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे -२६, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे -४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने डोअर टू डोअर प्रचार सुरू केला. तर काही जणांनी रॅलीचे आयोजन करून ताकद दाखवित आहेत.
प्रचाराचा शेवटचा रविवार दणाणून जाणार
निवडणुक प्रचार रॅलीत महिला वर्गाने डोअर टू डोअर प्रचारात आघाडी घेतली असून करताना उमेदवार व समर्थकांच्या डोक्यावर पक्षाच्या टोप्या, मफरल, उपरणे, झेंडे, पोस्टर, बॅनर, स्पीकर, छोटा हत्ती टेम्पो, ऑटो रिक्षा, तीन चाकीवर साउंड आदी लवाजमा घेऊन लहान लहान गल्ली बोळीतून मतांसाठी फिरत आहेत.
सकाळी १० ते दुपारी २ तर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमारी उडाली आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी ऐण वेळी भाजपात उडी घेतल्याने, त्या उमेदवारावर सरदार विना लढावे लागतानाहे. हीच परिस्थिती काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादी अजित पवार या विरोधी पक्षाची सरदार विना सैनिक लढण्यासारखी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने १० पेक्षा जास्त तीन चाकी रिक्षा एकाच प्रभागात प्रचारात घेऊन प्रचारात हायटेक भरारी घेतली आहे.
समस्या त्याच
निवडणुकीत सर्वच उमेदवार शुद्ध व स्वच्छ मुबलक पाणी, साफसफाई, रस्ते, नाले, अवैध बांधकामे नियमित करणे, तुंबलेल्या नाल्या, आरोग्य आदी सुविधा देण्याची अभिवचन देत आहेत.