उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:25 IST2025-12-24T15:24:22+5:302025-12-24T15:25:31+5:30
उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण झाले होते. कलानी विरुद्ध बोडारे असा सामना शहरवासीयांनी बघितला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना मजबूत करण्याचे काम बोडारे बंधू यांनी केले.

उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगरात उद्धवसेनेला जिवंत ठेवणारे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांणी माजी तीन नगरसेवक व सहकाऱ्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मुंबई पक्ष कार्यालयात प्रवेश झाला. बोडारे यांच्या भाजपा प्रवेशानेउद्धवसेना खिळशिळी झाली आहे.
उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण झाले होते. कलानी विरुद्ध बोडारे असा सामना शहरवासीयांनी बघितला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना मजबूत करण्याचे काम बोडारे बंधू यांनी केले. जिल्हाप्रमुख पदी राहिलेले चंद्रकांत बोडारे यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. तर लहान बंधू असलेले धनंजय बोडारे यांची शहरप्रमुख पदावरून कल्याण जिल्हाप्रमुख पदी बढती झाली. दरम्यान पर्यावरणवादी सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्या प्रकरणी धनंजय बोडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्यावर अटकेची तलवार लटकली होती. ऐण महापालिका निवडणुकी दरम्यान कोणताही अडसर नको म्हणून धनंजय बोडारे यांनी धर्मपत्नी व माजी नगरसेवक वसुधा बोडारे, माजी नगरसेविका शीतल बोडारे, ओमी टीमच्या माजी नगरसेविका आशा नाना बिऱ्हाडे यांच्यासह सहकार्यांनी भाजप मुंबई कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित प्रवेश केला.
धनंजय बोडारे हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून शहरांत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी उपमहापौर, सभागृहनेता, विरोधी पक्ष नेता आदी महत्वाचे पदे महापालिकेत भूषविले असून तीन वेळा विधानसभा निवडणुक लढवीली आहे. काही मताच्या फरकाने ते पराभूत झाले. बोडारे यांच्या सोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष परमानंद गिरेजा, नाना बिऱ्हाडे, दिलीप महाराज, हंनी कल्याणी, राजकुमार लहराणी यांच्यासह भाजपात प्रवेश केला. तसेच दोन दिवसात उद्धवसेनेचे अन्य स्थानिक नेणे प्रवेश करणार असे संकेत शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिले.
भाजपाला मिळाला मराठी चेहरा
शहर भाजपाकडे माजी नगरसेवक प्रशांत पाटील, अर्चना करणकाळे असे मराठी चेहरा होते. मात्र संपूर्ण शहरस्तरावर प्रभाव टाकणारा चेहरा म्हणून बोडारे यांच्याकडे बघितले जाते. बोडारे यांच्या प्रवेशाणे मराठी परिसरात मराठी उमेदवारी निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली.