मुख्यमंत्र्यांच्या सभांंमुळे पाटील यांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:52 IST2019-05-24T00:51:02+5:302019-05-24T00:52:32+5:30
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जाहीर सभा घेतल्या.

मुख्यमंत्र्यांच्या सभांंमुळे पाटील यांचा विजय
भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जाहीर सभा घेतल्या. दुसरीकडे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने जाहीर सभा घेतली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांची एक सभा कल्याण पश्चिम तर भिवंडीत कामतघर येथे झाली. टोेरंटो कंपनीकडून होत असलेली जाचक बिलवसुली आणि पॉवरलूमसाठी विशेष योजनेचे आश्वासन दिले होते.
ओवेसींची सभा
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवेसी यांची एक प्रचारसभा भिवंडीत झाली.
आझमींची सभा
समाजवादी पक्षाने मुस्लिम चेहरा उतरवला होता. त्यासाठी अबू आझमी यांनी सभा घेतली. मात्र सभेचा परिाम झाला नाही.
तिवारींची सभा
भोजपुरी चित्रपट अभिनेते मनोज तिवारी यांचीही एक जाहीर सभा पाटील यांच्यासाठी झाली.