भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग

By नितीन पंडित | Updated: February 16, 2026 13:55 IST2026-02-16T13:54:58+5:302026-02-16T13:55:31+5:30

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: माजी महापौर विलास पाटील यांना महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयाने ...

Bhiwandi: Court allows Vilas Patil to file application for mayor's post; Shinde's moves gain momentum | भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग

भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग

- नितीन पंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: माजी महापौर विलास पाटील यांना महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयाने सोमवारी अटी शर्थींवर परवानगी दिली आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणात अटक केली असून न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पाटील यांनी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊन न्यायालयाने अटी शर्थींवर पाटील यांचा अर्ज मंजूर केला आहे.

विलास पाटील यांनी कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू नये, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर कोणाशीही संपर्क किंवा चर्चा करू नये. तसेच पोलीस ताफ्याचा खर्च देखील पाटील यांना करावा लागणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया विलास पाटील यांचे वकील ऍड.नारायण अय्यर यांनी दिली आहे. दरम्यान विलास पाटील यांना न्यायालयाने महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची परवाणगी दिल्याने महापौर निवडणुकीसाठी शिंदे सेनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र शिंदे सेना भाजपला बाजूला सारण्यात यशस्वी होणार, की भाजप सोबत जाणार हे महापौर निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे.

विलास पाटलांना अटक होताच शिंदेंचा प्लॅन चव्हाट्यावर
शुक्रवारी रात्री माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी अटक केली. पाटील यांना अटक करताच शिंदे सेनेने भिवंडी कल्याण रोड वरील नवी वस्ती भादवड परिसरातील दुकाने बंद केली. कोणार्क हे विलास पाटील शिंदे सेनेत नसतांनाही शिंदे सेनेने निषेध केला. यातच शिंदेंचा भाजपला बाजूला सारण्याचा प्लॅन चव्हाट्यावर आला.

शिंदे सेना महापौर व उपमहापौर अर्ज भरणार- प्रकाश पाटील
विलास पाटील यांना अटक झाल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली असून शिंदे सेनेचे नेते प्रकाश पाटील यांनी रविवारी मध्यरात्री शिंदे सेना महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिंदे सेना भाजप सोबत राहील की नाही हे महापौर पदाच्या निवडणुकी वेळेसच समजणार आहे.

भाजप एकत्र असून शिंदे सेना देखील भाजप सोबतच राहणार- रविकांत सावंत
भाजप मध्ये सुमित पाटील आणि नारायण चौधरी यांच्या दोन गट पडले असल्याच्या अफवा काही दिवसांपासून उठल्या होत्या, मात्र रविवारी भाजपचे सर्व २२ नगरसेवक भाजप कार्यालयात एकत्र आले होते.त्यामुळे भाजपमध्ये कधीही दोन गट नव्हते.तसेच शिंदे सेनेने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले तरी २० तारखेला महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी शिंदे सेना महापौर पदासाठीचे अर्ज मागे घेईल आणि महापौर भाजपचाच होईल अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष रवीकांत सावंत यांनी दिली आहे.

Web Title : भिवंडी: विलास पाटिल को महापौर पद के लिए नामांकन की अनुमति; शिंदे की चालें तेज।

Web Summary : विलास पाटिल को महापौर पद के लिए अदालत से नामांकन की अनुमति मिली। धोखाधड़ी के मामले में पाटिल की गिरफ्तारी के बाद शिंदे सेना की योजनाएं तेज हुईं। भाजपा ने एकता का दावा किया, महापौर चुनाव में शिंदे के समर्थन की उम्मीद है।

Web Title : Bhiwandi: Court allows Vilas Patil to file mayoral nomination; Shinde's moves accelerate.

Web Summary : Vilas Patil secured court permission to file for Mayor. Shinde's Sena plans intensified post-Patil's arrest in a fraud case. BJP asserts unity, anticipating Shinde's support in the mayoral election.