लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट

By नितीन पंडित | Published: May 16, 2024 09:09 PM2024-05-16T21:09:30+5:302024-05-16T21:10:27+5:30

भिवंडीत अल्पसंख्यांक मतांचे विभाजन होण्यासाठी महायुतीकडून उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप

AIMIM split in Bhiwandi even as the Lok Sabha elections were in its final phase | लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच भिवंडीत AIMIM पक्षात फूट

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच एमआयएम पक्षामध्ये फूट पडली आहे.भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाने ए बी फॉर्म सह अधिकृत उमेदवार म्हणून अक्रम खान यांना निवडणुकीत उभे केले असताना गुरुवारी या पक्षात फूट पडली. मागील अडीच वर्षांपासून कारागृहात बंद असलेल्या शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या गटाने लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या अनुपस्थित शहर सरचिटणीस अँड अमोल कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंब्याची घोषणा केली.

भिवंडीत अल्पसंख्यांक मतांचे विभाजन होण्यासाठी महायुती कडून उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप होत असतानाच आता एमआयएम मध्ये दोन गट पडले असल्याने दबक्या आवाजाने एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप करत आहे.

Web Title: AIMIM split in Bhiwandi even as the Lok Sabha elections were in its final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.