डंपरचा टायर फुटून 2 वर्षाच्या मुलाचा मुत्यू तर दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 12:20 IST2019-08-17T12:19:48+5:302019-08-17T12:20:40+5:30

उल्हासनगर कॅम्प नं 3 शांतीनगर रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अर्जुन पाल हा मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मालकाच्या दोन मुलांना घेऊन जात होता.

A 2-year-old boy was killed and two others injured when a dumper tire exploded | डंपरचा टायर फुटून 2 वर्षाच्या मुलाचा मुत्यू तर दोघे जखमी

डंपरचा टायर फुटून 2 वर्षाच्या मुलाचा मुत्यू तर दोघे जखमी

उल्हासनगर : शांतीनगर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान डंपरचा टायर फुटून टायरच्या आतील लोखंडी रिंग तेथून जाणाऱ्या मोटारसायकलवर आदळला. त्यामध्ये दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मुत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं 3 शांतीनगर रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अर्जुन पाल हा मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मालकाच्या दोन मुलांना घेऊन जात होता. त्यावेळी एम एच-04, डी जे 04, सी यू-100 नंबरच्या डंपरचा टायर फुटून टायरच्या आतील लोखंडी रिंग अर्जुन पाल यांच्या मोटारसायकलवर आदळली. मोटारसायकल खाली पडून लोखंडी रिंग लागल्याने दोन वर्षांचा हबीबउल्ला याचा जागीच मुत्यू झाला. तर मोठा भाऊ शहाउल्ला व अर्जुन पाल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डंपर चालक धर्मराज ढाकणे याला पोलिसांनी अटक केली. याप्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मध्यवर्ती पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: A 2-year-old boy was killed and two others injured when a dumper tire exploded