Solapur Flood; करमाळ्यात उजनी पाण्याच्या लाटा अन् भोसगीत बंद हापशाला येतेय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:28 IST2020-10-17T13:27:41+5:302020-10-17T13:28:05+5:30
सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस: एकीकडं वनराई बहरली.. दुसरीकडं मोठं नुकसान

Solapur Flood; करमाळ्यात उजनी पाण्याच्या लाटा अन् भोसगीत बंद हापशाला येतेय पाणी
सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेय. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच वरदायिनी उजनीत प्रचंड पाणीसाठ्यामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यांच्या सीमेवर समुद्र किनाºयाप्रमाणे लाटा दिसू लागल्या आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील भोसगी येथे तर अनेक दिवसांपासून बंद असलेल्या हापशांना पाणी येऊ लागले आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून वाहणाºया भीमा नदीचे पात्र मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. वादळी वाºयामुळे पाण्यात निर्माण झालेल्या लाटा ब्रिटिशकालीन डिकसळच्या पुलावर धडकल्यानंतर जणू मुंबईच्या समुद्र किनाºयावरील पाण्याच्या लाटांचा प्रत्यय इथल्या पर्यटकांना येऊ लागला आहे.
पुणे जिल्ह्यातून आलेली भीमा नदी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून उजनी धरणाकडे वाहते. उजनी धरण सध्या ओव्हरफलो झाले असून, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र करमाळा तालुक्यातील पुनर्वसित कंदर, सांगवी, वांगी, ढोकरी, भिवरवाडी, सोगाव, कुगाव, चिखलठाण, दहिगाव, पोमलवाडी, केत्तूर, वाशिंबे, कोंढारचिंचोली, टाकळी आदी २० गावांच्या शिवारात अथांग समुद्रासारखे पसरलेले आहे. पर्यटक वाढलेल्या पाण्यातून मच्छीमार बोटीद्वरे प्रवास करून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यात लाटा निर्माण होत आहेत.
----------
तरुणाईची सेल्फीसाठी धडपड
करमाळा व इंदापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाखालून भीमा नदी वाहत असून, पुलाच्या परिसरात पाण्यात निर्माण झालेल्या लाटा पुलाच्या कठड्याला धडकून उंच उडत असल्याने येणा?्या-जाणा?्यांना जणू मुंबईच्या समुद्रातील लाटांचा अनुभव येत आहे. तरुणाईची मोठ्या उत्साहात या लाटांचा पुलावर सेल्फी घेण्याची धडपड दिसून आली.