मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 05:10 IST2019-04-24T05:08:54+5:302019-04-24T05:10:03+5:30
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील विद्या खुळे यांनी नऊ महिन्यांच्या गर्भार अवस्थेत मतदानाचा हक्क बजावला आणि अर्ध्या तासातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले.

मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा!
श्रीपूर (जि़ सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील विद्या खुळे यांनी नऊ महिन्यांच्या गर्भार अवस्थेत मतदानाचा हक्क बजावला आणि अर्ध्या तासातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले.
दिवस भरले असतानाही विद्या ज्ञानेश्वर खुळे सकाळी ११ वाजता पतीसह श्रीपूर झेडपी शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेल्या. मतदान करून बाहेर येताच बाळंतकळा सुरू झाल्या. पती ज्ञानेश्वर यांनी त्वरित एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ११़३० वाजता त्यांना बाळ झाले.