सांगोल्यात रेल्वे गेट खाली एसटी बस अडकली; पुढे काय घडलं जाणून घ्या सविस्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 12:17 IST2022-11-05T12:14:25+5:302022-11-05T12:17:05+5:30
लोकमत न्युज नेटवर्क

सांगोल्यात रेल्वे गेट खाली एसटी बस अडकली; पुढे काय घडलं जाणून घ्या सविस्तर
सांगोला : मिरज रेल्वे गेट खाली भुयारी मार्गातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सांगोला आगाराची पंढरपूर -कोल्हापूर एसटी बस मध्येच अडकून राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनांच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्याने काहीकाळ गोंधळ उडाला.
दरम्यान, एसटी चालकाने अथक प्रयत्न करून पाण्यात अडकलेली बस काढल्याने खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास घेतला. हा प्रकार आज शनिवारी सकाळी ११:१५ च्या सुमारास घडला. दरम्यान भुयारी मार्गात गढूळ पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. रेल्वे प्रशासनाने दखल घेवून भुयारी मार्गा खाली पाण्याचा बंदोबस्त करून मार्ग सुरळीत करावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.