सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

By Appasaheb.patil | Published: May 7, 2024 11:28 AM2024-05-07T11:28:57+5:302024-05-07T11:29:38+5:30

पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केले नाही.

Solapur/Madha Lok Sabha Election; There is no polling at these two polling stations in the district | सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

सोलापूर : वीज, पाणी व रस्ता  नसल्याने मोहोळ तालुक्यातील भैरववाडी आणि मनगोळी येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळपासून आतापर्यंत दोन्ही गावांत एकही मतदान झाले नाही.

सोलापूर लोकसभेसाठी आज मंगळवार सात मे रोजी मतदान होत आहे. मनगोळी व भैरव वाडी या गावात सोमवारी दुपारीच मतदान यंत्र दाखल झाले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्र ही सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र अचानक मंगळवारी सकाळी वीज, पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केले नाही.

दरम्यान, ग्रामस्थांनी टाकलेल्या मतदानावरील बहिष्कार याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात आले असून प्रशासनाकडून ग्रामस्थांची मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Solapur/Madha Lok Sabha Election; There is no polling at these two polling stations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.