Solapur: 'मध्य'वर नाही शब्द, सोनिया गांधीकडे बोट सुशीलकुमार शिंदे यांचे येचुरींना फोन

By बाळकृष्ण परब | Updated: April 8, 2024 14:00 IST2024-04-08T12:04:24+5:302024-04-08T14:00:52+5:30

Solapur News:काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Solapur: No word on 'Central', finger pointed at Sonia Gandhi, Sushilkumar Shinde calls Yechury, CPI(M) still expects from Congress | Solapur: 'मध्य'वर नाही शब्द, सोनिया गांधीकडे बोट सुशीलकुमार शिंदे यांचे येचुरींना फोन

Solapur: 'मध्य'वर नाही शब्द, सोनिया गांधीकडे बोट सुशीलकुमार शिंदे यांचे येचुरींना फोन

- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

तूर्त शहर 'मध्य'साठी काँग्रेसकडून शब्द मिळालेला नाहीय. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बातचीत झाली असून याबाबत साेनिया गांधी निर्णय घेतील, असे बोलल्याची माहिती आडम यांनी दिली. महाविकास आघाडीत माकप सहभागी झाला असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आडम यांनी सोमवारी माकपकडून पाठिंबा जाहीर केला आहे.

Web Title: Solapur: No word on 'Central', finger pointed at Sonia Gandhi, Sushilkumar Shinde calls Yechury, CPI(M) still expects from Congress