आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणुका जिंका पण कुणाचा जीव घेऊ नका; अमित ठाकरेंचं भाजपला भावनिक आवाहन
By आप्पासाहेब पाटील | Updated: January 4, 2026 17:59 IST2026-01-04T17:10:48+5:302026-01-04T17:59:05+5:30
Solapur Municipal Corporation Election: निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ लागली आहे, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? मग आम्ही सर्वजण माघार घेतो? तुम्ही निवडणूका जिंका ? राज्याची वाट लावा? पण निष्पाप कोणाचेही बळी घेऊ नका असे भावनिक आवाहन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात केले.

आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणुका जिंका पण कुणाचा जीव घेऊ नका; अमित ठाकरेंचं भाजपला भावनिक आवाहन
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून मनसेच्या एका कार्यकर्त्याचा खून करण्यात आला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ लागली आहे, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? मग आम्ही सर्वजण माघार घेतो? तुम्ही निवडणूका जिंका ? राज्याची वाट लावा? पण निष्पाप कोणाचेही बळी घेऊ नका असे भावनिक आवाहन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात केले.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे याचा खून झाला. या घटनेनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, रविवारी मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी खुनी हल्ला झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. राजकारणामुळे होत असलेली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः समक्ष येऊन पाहावी. माझ्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे, आता मी गप्प बसणार नाही, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.