Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

By संताजी शिंदे | Published: April 28, 2024 01:34 PM2024-04-28T13:34:09+5:302024-04-28T13:35:05+5:30

Solapur News: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत.

Solapur: Manoj Jarange-Patil tour of Belgaum via Solapur | Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

- संताजी शिंदे 
सोलापूर - मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. याच दिवशी मनोज जरांगे-पाटील हेही सोलापूरात येणार आहेत, मात्र ते पुढे सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत.

सध्या निवडणूकीचे वातावरण तापलेले असताना, अचानक मनोज जरांगे-पाटील यांचा दौरा असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी दिली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे सोलापुरातील मरीआई चौक येथे आगमन होणार आहे. आगमना दरम्यान त्यांचे स्वागत होणार असून, ते पुढे मंगळवेढा, सांगोला मार्गे सांगली येथे जाणार आहेत. सांगलीमध्ये रात्रीचा मुक्काम करून ते पुढे बेळगाव येथे होणाऱ्या एका जाहीर सभेला जाणार आहेत. सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासारखी दिग्गज मंडळी सोलापूरात येत आहेत.

राजकीय नेत्यांच्या धामधूमीत निवडणूकीचे वातावरण ढवळून निघत असताना, अचानक सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे शहर परिसरातील वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच जरांगे पाटील यांनी ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा..! असा संदेश मराठा समाजाला दिलेला होता. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी गाव भेट आणि संवाद दौरा होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे होत आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Solapur: Manoj Jarange-Patil tour of Belgaum via Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.