सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीनंतर जयसिध्देश्वर महास्वामी आघाडीवर...कोण जिंकणार सोलापूर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:58 AM2019-05-23T09:58:23+5:302019-05-23T10:06:59+5:30

Solapur Lok Sabha Election Results 2019

Solapur Loksabha Election Results 2019: After the first round, Jayasiddeshwar Mahaswami leads the front ... Who will win Solapur? | सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीनंतर जयसिध्देश्वर महास्वामी आघाडीवर...कोण जिंकणार सोलापूर ?

सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीनंतर जयसिध्देश्वर महास्वामी आघाडीवर...कोण जिंकणार सोलापूर ?

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ- पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं सोलापूर मतदारसंघात काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपाचे उमेदवार शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल दीड ते दोन लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपने सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे यांच्यापुढे जयसिध्देश्वर महास्वामी याच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेही आपले नशीब अजमावत आहेत़ यंदा सुशीलकुमार श्ािंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह जयसिध्देश्वर महास्वामी यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २३ हजार ५११ मतं मिळाली असून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात १८ हजार ८०२ मतं पडली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १० लाख ८१ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे़    

गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे अ‍ॅड़ शरद बनसोडे यांनी पराभव केला होता 

Web Title: Solapur Loksabha Election Results 2019: After the first round, Jayasiddeshwar Mahaswami leads the front ... Who will win Solapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.