Solapur: साडेबारापर्यंत सोलापुरात २५ टक्क्यांचे मतदान; माढ्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 7, 2024 01:42 PM2024-05-07T13:42:32+5:302024-05-07T13:43:51+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के मतदान झाले.

Solapur: 25 percent polling in Solapur by 12:30; Spontaneous response in Madha too: | Solapur: साडेबारापर्यंत सोलापुरात २५ टक्क्यांचे मतदान; माढ्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

Solapur: साडेबारापर्यंत सोलापुरात २५ टक्क्यांचे मतदान; माढ्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

- बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर - सोलापूरमाढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात २५ टक्के मतदान झाले. तर माढ्यात २२ टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात उस्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली असून उन्हाचीही तमा न बाळगता मतदार मतदान केंद्रासमोर गर्दी करतायेत.

सोलापूर मतदारसंघात १९६८ तर माढ्यात २०३० मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. 
मांजरेवाडी परिसरातील नीलम नगर जिल्हा परिषद शाळेत दुपारी ११ दरम्यान ४० टक्के मतदान झाले. जुना विडी घरकुल परिसरातील मतदान केंद्रासमोर १०० मीटर पर्यंत मतदारांची रांग लागली आहे.

Web Title: Solapur: 25 percent polling in Solapur by 12:30; Spontaneous response in Madha too:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.