धक्कादायक; पोलिसाच्या मारहाणीता कंटाळून सांगोला तालुक्यातील तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 19:20 IST2021-02-08T19:19:28+5:302021-02-08T19:20:27+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; पोलिसाच्या मारहाणीता कंटाळून सांगोला तालुक्यातील तरूणाची आत्महत्या
सांगोला : पोलिसांच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी चिकमहुद (ता. सांगोला) येथे घडली आहे. दादासो शंकर देठे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान माझ्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या मेटकरी या पोलिसावर कारवाई करावी असा अरोप करीत मृताच्या आईने हंबरडा फोडला असून त्या मेटकरी पोलीसामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमासमोर व्हायरल झाल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही मृतदेहाला कोणाला हात लावू देणार नाही असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतल्याने चिकमहूद गावात वातावरण तणावाचे झाले आहे.