राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:22 PM2019-04-10T12:22:30+5:302019-04-10T12:24:15+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील समर्थकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Rahul Kul, Prashant Patil took a meeting with Mohite-Patil | राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट

राहुल कुल, प्रशांत पाटील यांनी घेतली मोहिते-पाटील यांची भेट

Next
ठळक मुद्दे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज अकलूज येथील शिवरत्नवर खा. मोहिते- पाटील यांची भेट घेऊन दोन तास बंद खोलीत चर्चा केलीखा. विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा, सोलापूरबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अकलूज : बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ खा. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी विशेष लक्ष द्यावे, यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज अकलूज येथील शिवरत्नवर खा. मोहिते- पाटील यांची भेट घेऊन दोन तास बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील समर्थकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

माढा व सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा खा. विजयसिंह मोहिते-पाटील सांभाळत असताना आता बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी आ. राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी मंगळवारी दुपारी शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली.

 यावेळी त्यांनी बंद खोलीत सुमारे दोन तास राजकीय विषयावर चर्चा केली़ खा. विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा, सोलापूरबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत़ 

Web Title: Rahul Kul, Prashant Patil took a meeting with Mohite-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.