तुळजापूरकडे निघालेली मिनीबस पंढरपुरात पलटी; दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी
By Appasaheb.patil | Updated: July 26, 2023 12:47 IST2023-07-26T12:47:08+5:302023-07-26T12:47:42+5:30
शिर्डी (जि. अहमदनगर) येथील भाविक हे बुधवारी पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

तुळजापूरकडे निघालेली मिनीबस पंढरपुरात पलटी; दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पंढरपूरहुनतुळजापूरकडे निघालेल्या भाविकांच्या मिनीबसचा पंढरपूर शहरात अपघात झाला आहे. या अपघातात दहा ते पंधरा भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पंढरपूर ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शिर्डी (जि. अहमदनगर) येथील भाविक हे बुधवारी पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. पंढरपुरातील दर्शन आटोपून हे भाविक तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सकाळी निघाले हाेते. मात्र पंढरपूर शहरातील तीन रस्ता चौकात भाविकांची मिनीबस पलटी झाली. यात चालक व एका भाविकाला जास्त मार लागल्याने ते दोघे जखमी झाले आहेत. अन्य भाविक किरकोळ जखमी झाल्याचे जिल्हा रूग्णालय प्रशासनाने सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस व परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले.