मोहोळजवळील चिखली पाटीजवळ जीपचा अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:09 IST2021-03-26T11:42:00+5:302021-03-26T12:09:02+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मोहोळजवळील चिखली पाटीजवळ जीपचा अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी
मोहोळ : पुण्याहुन सोलापूरकडे येणारी जीपने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या आपघातात क्रुझर गाडीतील एक जण ठार तर तिघे गंभीर जण जखमी झाल्याची घटना पहाटे चारच्या सुमारास चिखली (ता. मोहोळ) पाटीजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून कारंब्याकडे निघालेली क्रुझर जीप एमएच १३ सीके ०७६७ ही चिखली पाटीजवळ आली असता पुढे चाललेल्या एका अज्ञात वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात जुल्फिकार शेख उमर शेख (वय ३० रा कारंबा, ता. उ. सोलापूर) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर सोहेल फरीद शेख (वय २५ राहणार कारंबा) , तकदीर इनुस शेख (वय २७ रा कारंबा) , हीना दिलावर मुलाणी (वय २२ राहणार अकोलेकाटी) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.