भाजपा उमेदवाराच्या सभेसाठी पवन कल्याण यांना सोलापूरकडून निमंत्रण
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 13, 2024 18:57 IST2024-04-13T18:57:36+5:302024-04-13T18:57:57+5:30
तेलुगू भाषिकांना आकर्षित करण्यासाठी तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण यांची सोलापुरात सभा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत

भाजपा उमेदवाराच्या सभेसाठी पवन कल्याण यांना सोलापूरकडून निमंत्रण
सोलापूर : टॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांना प्रचारासाठी सोलापुरात येण्याची विनंती केल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली. पवन कल्याण हे जन सेना पक्षाचे संस्थापक असून जन सेना पक्षाने सध्या आंध्र प्रदेशात तेलुगू देशम् या पक्षासोबत युती केली आहे. दोन्ही पक्ष महायुती सोबत आहेत.
सोलापुरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठी आहे. तेलुगू भाषिकांना आकर्षित करण्यासाठी तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण यांची सोलापुरात सभा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रदेश कार्यालयाकडून पवन कल्याण यांना सभेचे निमंत्रण दिल्याची माहिती काळे यांनी दिली.