धक्कादायक; मालट्रक-कारची समोरासमोर धडक; तिघे जागीच ठार, १३ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 07:20 PM2021-08-02T19:20:23+5:302021-08-02T19:20:29+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Head-on collision of a truck-car; Three killed, 13 injured; Incident near Sangola | धक्कादायक; मालट्रक-कारची समोरासमोर धडक; तिघे जागीच ठार, १३ जण जखमी

धक्कादायक; मालट्रक-कारची समोरासमोर धडक; तिघे जागीच ठार, १३ जण जखमी

googlenewsNext

सोलापूर - भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने समोरून येणार्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत कार चालकासह दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. याच घटनेत १३ जण जखमी झाल्याची घटना सांगोल्याजवळील सांगोला-मिरज रोडवरील करांडेवाडी फाट्याजवळ घडली. 

दरम्यान, या अपघातानंतर मालट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला आहे. मृत व जखमी हे गुलबर्गा जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

Web Title: Head-on collision of a truck-car; Three killed, 13 injured; Incident near Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.