Good News; दोन वर्षांची चिमुरडी अन् ऐंशी वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 11:59 IST2020-07-30T11:57:21+5:302020-07-30T11:59:38+5:30

‘देव तारी त्याला कोण मारी’ ; वैराग कोविड सेंटरमधील घटना

Good News; Two-year-old Chimurdi and eighty-year-old grandfather Koronamukta | Good News; दोन वर्षांची चिमुरडी अन् ऐंशी वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

Good News; दोन वर्षांची चिमुरडी अन् ऐंशी वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

ठळक मुद्देआत्तापर्यंत १६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी १०७ रुग्ण बरे झालेसर्व प्रशासन यंत्रणांचे चांगले काम व त्यास नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद रुग्ण वाढीचा आलेख सत्तर टक्क्यांनी उतरून तो तीस टक्क्यांवर आला

वैराग : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे  वैराग (ता. बार्शी) येथे दोन वर्षांची चिमुरडी तिच्या वाढदिनीच कोरोनामुक्त झाली. या आनंदाप्रीत्यर्थ तिचे सर्वांनीच गुलाबपुष्प देऊन आनंद व्यक्त केला. या जोडीलाच एका ऐंशी वर्षांच्या वृद्धांनीही कोरोनावर मात केली.

बुधवारी ३५ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये दोन व चार वर्षांच्या चार लहान मुलीसह सत्तर व ऐंशी वर्षांच्या वृद्धांचा समावेश असल्याने येथील कर्मचाºयांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन घरी पाठवले. कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. अजित सपाटे यांनी ही माहिती दिली.
यामुळे रुग्ण बरे होण्याचे शतक पार झाले आहे.

आत्तापर्यंत १६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी १०७ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप ४५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, सर्व प्रशासन यंत्रणांचे चांगले काम व त्यास नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे रुग्ण वाढीचा आलेख सत्तर टक्क्यांनी उतरून तो तीस टक्क्यांवर आला असल्याची माहिती आरोग्यसेविका शोभा मस्के यांनी दिली.

Web Title: Good News; Two-year-old Chimurdi and eighty-year-old grandfather Koronamukta