मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याला ५ लाखाला गंडविले; पिन कोडबाबत हातचलाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 23:56 IST2022-11-12T23:55:31+5:302022-11-12T23:56:09+5:30
दरम्यान, बाबासो शेळके यांनी घडला प्रकार शाखाधिकारी यांना सांगितला

मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याला ५ लाखाला गंडविले; पिन कोडबाबत हातचलाकी
आप्पासाहेब पाटील
सांगोला/सोलापूर : अज्ञात दोघा भामट्यांनी शेतक-यास एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने पिन कोडची माहिती घेऊन हात चलाकीने अदलाबदल केलेल्या एटीएमद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी होऊन सुमारे ४ लाख ८५ हजार ४५२ रुपये परस्पर काढून शेतकऱ्याला गंडा घातला. ही घटना सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ते वेगवेगळ्या एटीएममधून २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर ०२२ या कालावधीत घडली. याबाबत आज सायंकाळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, बाबासो केराप्पा शेळके ( रा.सावे , शेळकेवाडी ता सांगोला ) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या दोन भामट्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बाबासो शेळके यांनी घडला प्रकार शाखाधिकारी यांना सांगितला, त्यानंतर त्यांनी स्टेट बँकेचे त्या दिवशीचे एटीएम मशीनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पाठीमागे रांगेत उभारलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पैसे भरण्याचे मदत करण्याच्या बाहण्याने त्यांच्याकडील एसबीआय बँकेचे हातचलाखीने एटीएमची अदलाबदल केल्याचे दिसून आल्याने त्यांनी बँक खाते तपासले असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.