युती असताना अजित पवार गट अन् शिंदेसेना २२ ठिकाणी आमने-सामने; मतदारही संभ्रमात पडले दोन्ही पक्षांचे नेते म्हणताहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:59 IST2026-01-02T14:58:26+5:302026-01-02T14:59:01+5:30
आम्ही मैत्रीपूर्ण लढू

युती असताना अजित पवार गट अन् शिंदेसेना २२ ठिकाणी आमने-सामने; मतदारही संभ्रमात पडले दोन्ही पक्षांचे नेते म्हणताहेत
सोलापूर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांची युती जाहीर झाली असली तरी दोन्ही पक्षांनी एकूण २२ ठिकाणी आमने सामने उमेदवार उभे केले आहेत. शुक्रवार, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आमने सामने असलेल्या ठिकाणी उमेदवारी मागे घेणार का, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना विचारले असता दोघांनीही साफ नकार दिला. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आमने सामने आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू, असे सांगितले.
जिंकून येणार असल्याच उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेना तसेच अजित पवार गटाचे उमेदवार आमने सामने असल्यास त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात चर्चा होईल.
संतोष पवार, शहर व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी (अजित पवार)
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. १०२ ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी पक्षाने केली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अचानकपणे शिंदेसेनेची तसेच अजित पवार गटाची युती जाहीर झाली.
आजच्या बैठकीत तोडगा निघणार
दोघांच्या वाट्याला प्रत्येकी ५१ जागाही निश्चित झाल्या. असे असतानाही दोन्ही पक्षांनी निश्चित जागांपेक्षा ज्यादा २२ ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले. या ठिकाणी उमेदवार अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवेनात. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांची अडचण झाली. शुक्रवारी दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या २२ ठिकाणांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील. तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदेसेना तसेच अजित पवार गटाची युती आहे. आमने सामने असलेल्या जागांवर सकारात्मक चर्चा होईल. अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत.
प्र.क्र.
१-क
१-ड
२-ड
१०- ब
१०- क
११-अ
११- ब
१३-क
१३-ड
१७-अ
१७-ब
१७-ड
२०-ड
२२-अ
अजित बनसोडे
२२-ब
२२-क
तहेसीन शेख
२२-ड
२३-अ
अनिल बनसोडे
२३-क
२५-ब
२५-क सुकेशनी गंगोंडा
या ठिकाणी आहेत आमने - सामने
राष्ट्रवादी (अजित पवार) शिंदेसेनेचे उमेदवार
शुभांगी कळंब
सिद्धाराम आनंदकर
मुस्ताक पटेल
दिपाली जाधव
रूपेशकुमार भोसले
अहमद मोमीन
लक्ष्मी बनसोडे
दीपिका माळी
दिनेश घोडके
इम्रान पठाण
नूतन गायकवाड
इब्राहिम कुरेशी
नदाफ मोसीन
मोहम्मद तौफिक शेख
अंबिका जाधव
जुबेर शेख
चित्रा कांबळे
लता गायकवाड
वैभव हत्तुरे
२६-क
सागर हत्तुरे
सपना कोळी
संजय सरवदे
गणेश कुलकर्णी
कृष्णवेणी कोंडा
हेमलता गायकवाड
लोकेश नंदाल
जयंत होले-पाटील
श्रीधर आरगोंड
लक्ष्मी माढेकर
सुमित मन्सावाले
श्रीनिवास संगा, प्रभारी: मनपा पूर्व विभाग निवडणूक समिती, शिंदेसेना
अंबादास गोरंट्याल
मोहसीन शेख
सुधीर संगोपाग
अंजू गायकवाड
अनिता बुक्कानुरे
नितीन गायकवाड
मदनलाल पोलके
धनंजय कारंडे
प्रभाकर चौगुले
बसवराज बिराजदार