अनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड
By Appasaheb.patil | Updated: October 19, 2019 17:01 IST2019-10-19T16:58:15+5:302019-10-19T17:01:22+5:30
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील घटना; शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला घटनेचा निषेध

अनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचार गाडीची तोडफोड
सोलापूर : येथील मोहोळविधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचार गाडीची अनगर (ता़ मोहोळ) येथे तोडफोड करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
दरम्यान, मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचाराची गाडी अनगर भागात फिरत होती. त्यावेळी अनगर चौकातील खंडोबाची वाडी येथील चौकात काही अज्ञात लोकांनी येऊन प्रचार गाडीच्या चालकास मारहाण करून गाडीची तोडफोड केली.
याशिवाय प्रचार गाडीतील साऊंडचा आवाज का कमी करीत नाही असे म्हणून चालकास मारहाण केली. याचवेळी चालकाच्या खिशातील मोबाईल व सतराशे रूपये हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे असे सांगितले. याबाबत मोहोळ पोलीसात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही पोलीसांनी सांगितले.