बघता बघता पेटलेली कार जळून खाक, साखरपुड्याला जाणारे चौघे बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:07 IST2021-04-02T16:07:07+5:302021-04-02T16:07:56+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

बघता बघता पेटलेली कार जळून खाक, साखरपुड्याला जाणारे चौघे बालंबाल बचावले
वेळापूर - सांगोला अकलूज रोडवर वेळापूरनजीक शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता स्कोडा कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, या गाडीतून प्रवास करणाऱ्या चार जणांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे चार जणांचा जीव वाचला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोल्याहून माळीनगरला साखरपुडा या कार्यक्रमासाठी चार जण कारने जात होते. वेळापूरजवळ आल्यानंतर चालत्या कारने अचानक पेट घेतला. बघता बघता कार पूर्णपणे जळून खाक झाली. या गाडीतून प्रवास करणाऱ्या चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.