Breaking; वाघोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; सराफ दुकानांसह चार घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:37 IST2021-04-08T12:37:16+5:302021-04-08T12:37:16+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; A swarm of thieves in Wagholi; Four houses were demolished, including a jewelery shop | Breaking; वाघोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; सराफ दुकानांसह चार घरे फोडली

Breaking; वाघोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; सराफ दुकानांसह चार घरे फोडली

कामती : मोहोळ तालुक्यातील वाघोली  येथे आज पहाटे २ ते ३ च्या दरम्यान सोनाराच्या दुकानासह चार घरे चोरट्यांनी फोडली आहेत. सदाशिव होनराव, खंडप्पा जिरगे, जयदीप माने, अशोक शेटे, भीमाशंकर पोतदार (सर्व रा. वाघोली ता. मोहोळ) यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली.

मोहोळ तालुक्यातील वाघोली गावात भीमाशंकर पोतदार यांचे सोन्याचे दुकान फोडून पंधरा तोळे सोने, सदाशिव होनराव यांच्या घरातील दोन तोळे सोने, जयदीप माने यांच्या घरातील अकराशे रुपये एवढे ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

पुढे चोरट्याने खंडप्पा जिरगे आणि अशोक शेटे यांचे घरात प्रवेश केला पण त्यांच्या हाती काही न लागल्याने उचका-उचकी केली आहे, अशी माहिती घर मालकांनी दिली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्वानपथकाचे पाचारण करणार असल्याची पोलिसांची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने दिली आहे. कामती पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Breaking; A swarm of thieves in Wagholi; Four houses were demolished, including a jewelery shop