Breaking; चिकमहुद दिघंची रोडवर टिपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 18:27 IST2022-05-22T18:27:30+5:302022-05-22T18:27:37+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; चिकमहुद दिघंची रोडवर टिपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
सांगोला : सांगोला तालुक्यातील चिकमहुद दिघंची रोडवर भरधाव टिपरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सांगोला पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चिकमहूदजवळील धोकादायक वळणावरील एका हॉटेलसमोर घडला. घटनास्थळी सांगोला पोलिसांचे पथक दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. अपघातातील जखमी व मृत हे वरकुटे (ता. माण, जि. सातारा ) येथील असल्याचे सांगण्यात आले.